Nothing phone (1) :  हा Transparent फोन आज होणार लॉन्च; जाणून घ्या माहिती

Nothing phone (1) : हा Transparent फोन आज होणार लॉन्च; जाणून घ्या माहिती

लंडनस्थित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड Nothing आपला पहिला स्मार्टफोन Nothing phone (1) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च इव्हेंट आज रात्री 8.30 वाजता सुरू होईल आणि ऑनलाइन पाहता येईल. अधिकृत लॉन्चच्या आधी, कंपनीने हँडसेटच्या पारदर्शक बॅकसह चमकदार डिझाइन ग्राहकांना दाखवली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लंडनस्थित ग्राहक तंत्रज्ञान ब्रँड Nothing आपला पहिला स्मार्टफोन Nothing phone (1) लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. लॉन्च इव्हेंट आज रात्री 8.30 वाजता सुरू होईल आणि ऑनलाइन पाहता येईल. अधिकृत लॉन्चच्या आधी, कंपनीने हँडसेटच्या पारदर्शक बॅकसह चमकदार डिझाइन ग्राहकांना दाखवली आहे.

हा फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येण्याची माहिती मिळत आहे. हा फोन लॉन्च होण्यापूर्वी आम्ही तुम्हाला त्याच्या फीचर्सबद्दल सांगत आहोत. अधिकृतरीत्या फारशी माहिती शेअर करण्यात आलेली नसली तरी लीक रिपोर्टमुळे Nothing phone (1) च्या फीचर्सची माहिती मिळाली आहे.

Nothing Phone(1) कॅमेरा

Nothing Phone(1) चा टीझर कंपनीने शेअर केला आहे. या टीझरनुसार, Nothing Phone(1) ला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यामध्ये अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर देखील आहे, ज्याद्वारे तुम्ही मॅक्रो इमेजेस शूट करू शकाल आणि ऑटो फोकससाठीसुद्धा वापरु शकाल. या फोनच्या मागील कॅमेराचा सेन्सर 50MP असेल आणि त्याचा अल्ट्रा-वाइड सेन्सर 16MP चा असू शकतो.

Nothing phone (1) :  हा Transparent फोन आज होणार लॉन्च; जाणून घ्या माहिती
हा स्टायलिश स्मार्टफोन आता करणार धमाल, हजारोंचा फोन फक्त 499 मध्ये

Nothing Phone(1) ची किंमत किती असेल

मिळालेल्या माहितीनुसार हा फोन तीन स्टोरेज वेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. त्याची सुरुवातीची किंमत सुमारे 30 हजार पासून असू शकते. त्याच वेळी, या फोनच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला 4500 mAh बॅटरी, 45w चार्जर सपोर्ट आणि 33w फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. मात्र या फोनसोबत चार्जर उपलब्ध होणार नाही. अशी माहिती मिळते.

Nothing Phone(1) प्रोसेस आणि डिस्प्ले (1)

या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह OLED डिस्प्ले दिला जात आहे. तसेच, सेल्फी कॅमेराचा पंच-होल कटआउट डिस्प्लेच्या मध्यभागी असेल. दुसरीकडे, या फोनच्या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, Nothing Phone(1) Snapdragon 778G+ SoC (Snapdragon 778G+ SoC) वर काम करेल.

Nothing phone (1) :  हा Transparent फोन आज होणार लॉन्च; जाणून घ्या माहिती
व्हॉट्सअॅपमध्ये आलं नवं कामाचं फीचर्स, असं करेल काम

तुम्ही या अॅप वरुन Nothing Phone(1) खरेदी करू शकता

Nothing Phone(1) Transparent स्मार्टफोन भारतात १२ जुलै रोजी फ्लिपकार्टवर लॉन्च केला जाईल. हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टवर लिस्ट झाला होता. यासोबतच हा फोन 12 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता लॉन्च होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे.

Nothing phone (1) :  हा Transparent फोन आज होणार लॉन्च; जाणून घ्या माहिती
Health Tips: : घाम येऊ नये म्हणून भरपूर पावडर लावताय? या नुकसानीची जाणीव ठेवा!
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com