तेलकट समोसा नाहीतर आता घरी ट्राय करा बेक समोसा

तेलकट समोसा नाहीतर आता घरी ट्राय करा बेक समोसा

समोसा हा पदार्थ सर्वांना आवडतो. मात्र काहीजण तो तेलकट असल्यामुळे खात नाहीत. मात्र आता आम्ही तुम्हाला तेलकट समोसा नाहीतर बेक समोसा कसा करायचा ते सांगणार आहोत.
Published by :
Siddhi Naringrekar

समोसा हा पदार्थ सर्वांना आवडतो. मात्र काहीजण तो तेलकट असल्यामुळे खात नाहीत. मात्र आता आम्ही तुम्हाला तेलकट समोसा नाहीतर बेक समोसा कसा करायचा ते सांगणार आहोत.

२ कप मैदा

२ उकडलेले बटाटे

२ चमचे तेल

१ कप वाटाणे

१ लहान चमचा हळद

३ चमचे लाल मिरची पावडर

२ चमचा धना पावडर

मीठ चवीनुसार

पाणी

सर्वप्रथम एका भांड्यात मैद्या घ्या आणि त्याच तेल आणि मीठ टाकून कणीक मळून घ्या. कढईत तेल गरम करून त्यामध्ये जीरे, गरम मसाला, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, धना पावडर, मीठ चवीनुसार आणि उकडलेला बटाटा परतून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यावर एकीकडे कणकेची बारीक पुरी लाटून घ्या आणि त्या पुरीचे मधून दोन भाग करा.

या अर्ध्या भागात तयार सारण भरून त्याला समोश्यासारखा आकार द्या. आता काहीवेळ एका कुकरला गरम होण्यासाठी ठेवा. गरम कुकरमध्ये खाली मीठ टाका आणि त्यावर स्टँड ठेवा.

तेलकट समोसा नाहीतर आता घरी ट्राय करा बेक समोसा
स्वादिष्ट मटार पराठा बनवा; वाचा रेसिपी

गॅस मध्यम आचेवर ठेवून त्या कुकरमधील स्टँडवर एक तेल प्लेट ठेवा. प्लेटला तेल लावून त्यावर समोसे ठेवून कुकरवर एक झाकण ठेवा. 15मिनिटांत समोसे बेक होतील. तुमचे बेक समोसे तयार आहेत. हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

तेलकट समोसा नाहीतर आता घरी ट्राय करा बेक समोसा
नाश्तासाठी अतिशय चविष्ट कोबी पराठा बनवा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com