Ghavne: असे तयार करा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार घावणे, जाणून घ्या रेसिपी...

Ghavne: असे तयार करा मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार घावणे, जाणून घ्या रेसिपी...

घावणे हा पदार्थ महाराष्ट्रातील फेमस डिश आहे.
Published by :
Sakshi Patil

घावणे हा पदार्थ महाराष्ट्रातील फेमस डिश आहे. खासकरून कोकण भागात हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. घावणे हा पदार्थ तांदळाच्या पिठाचा वापर करून तयार केला जातो. त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी अप्रतिम लागते.

साहित्य (Ingredients):

१ कप तांदूळ ( 1 cup Rice )

मीठ चवीनुसार ( Salt to taste )

तेल ( Oil )

कृती (Procedure):

- १ कप तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि ५ तास भिजण्यासाठी झाकून ठेवा.

- ५ तास तांदूळ भिजल्यावर तांदूळ एका मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

- घावणे बनवण्यासाठी यात पाणि टाकून तांदळाचं पातळ मिश्रण तयार करा आणि त्यात चवीनुसार मीठ घाला.

- एका बाजूला तवा गरम होण्यासाठी ठेवा.

- तवा कडकडीत गरम झाल्यानंतर अर्धा कांदा चिरा आणि तेलात बुडवून तव्याला तेल लावा. 

- एका छोट्या वाटीने बॅटर ढवळा, व वाटीभर बॅटर तव्यावर ओता.

- वर झाकण ठेऊन १० ते १५ सेकंद वाफ द्या.

- १५ सेकंद झाल्यानंतर झाकण काढून गॅस मध्यम आचेवर करून घावण पलटी करा, व दोन्ही बाजूने भाजून घ्या.

- मऊ, लुसलुशीत आणि जाळीदार घावणे तयार होतील.

- हे घावणे खोबऱ्याच्या हिरव्या चटणीसोबत सर्व करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com