Chicken Shawarma: घरच्याघरी तयार करा चटकदार आणि पौष्टिक चिकन शॉरमा; जाणून घ्या रेसिपी...

Chicken Shawarma: घरच्याघरी तयार करा चटकदार आणि पौष्टिक चिकन शॉरमा; जाणून घ्या रेसिपी...

शॉरमा एक लेबनीज खाद्यपदार्थ आहे.
Published by :
Sakshi Patil

शॉरमा एक लेबनीज खाद्यपदार्थ आहे. शॉरमा जगातील सर्वात लोकप्रिय खाद्यपदार्थांपैकी एक असून इजिप्त, लेव्हान्त आणि अरब राष्ट्रांमध्ये विशेषतः प्रचलित आहे.

साहित्य

2 बोनलेस चिकनचे तुकडे

½ कप व्हिनेगर

¼ कप दही

१ टीस्पून पांढरी मिरी पावडर

¼ टीस्पून काळी मिरी पावडर

¼ टीस्पून वेलची पावडर

1 टीस्पून सर्व मसाले

½ कप ताहिनी

½ टीस्पून लसूण (किसलेले)

1 टेस्पून ओवा

1 छोटा कांदा (बारीक चिरलेला)

4 कप चिरलेली लेट्यूस

पिटा ब्रेड्स

चवीनुसार मीठ

लिंबाचा रस

तेल

प्रक्रिया

  • बाऊलमध्ये व्हिनेगर, दही, तेल, मीठ, पांढरी मिरी पावडर, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस, सर्व मसाले, वेलची पावडर आणि चिकन घालून निट मॅरीनेट करा.

  • मॅरीनेट केलेले चिकन २-३ तास ​​तसंच ठेवा.

  • बाऊलमध्ये ताहिनी, दही, लसूण, ओवा, मीठ आणि तेल घालून एका बाजूला ठेवा.

  • बेकिंग ट्रेवर चिकन ठेवा आणि त्यावर ताहिनी मिश्रण लावा आणि 170*C वर 30 मिनिटे बेक करा.

  • पूर्ण झाल्यावर चिकनचे जाडसर काप करा.

  • पिटा ब्रेडवर एक चिरा द्या आणि त्याला थोडा शेकवून घ्या.

  • शेकवलेल्या ब्रेडवर चिकन, कांदे, तीनही, शेजवान चटनी आणि मेयोनीज घालून रोल करा.

चटकदार आणि पौष्टिक चिकन शॉरमा तयार होईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com