आलू टिक्की सोडा ट्राय करा हेल्दी-टेस्टी कारल्याची टिक्की

आलू टिक्की सोडा ट्राय करा हेल्दी-टेस्टी कारल्याची टिक्की

लहान मुले सहसा कारले खात नाही. यामुळे त्यातील पौष्टीक तत्वेही शरीराला मिळत नाही. अशात, आम्ही तुम्हाला आज अशी रेसिपी सांगणार आहोत जेणेकरुन मुले स्वतःहून कारले खातील. ती म्हणजे कारल्याची टिक्की.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

Karela Tikki : लहान मुले सहसा कारले खात नाही. यामुळे त्यातील पौष्टीक तत्वेही शरीराला मिळत नाही. अशात, लहान मुलांनी कारलं खाण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीक्स कराव्या लागतात. परंतु, आम्ही तुम्हाला आज अशी रेसिपी सांगणार आहोत जेणेकरुन मुले स्वतःहून कारले खातील. ती म्हणजे कारल्याची टिक्की. कारले कडू असल्यामुळे तिची टिक्कीही कडू असेल असे तुम्हाला वाटतं असेल. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही. कारल्याच्या टिक्कीची चव अप्रतिम असते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कारल्याच्या टिक्की तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यासाठी उपयुक्त ठरतात.

साहित्य

2 मोठे कडवे

2 ½ कप लो फॅट किसलेले पनीर

1 कांदा

2 हिरव्या मिरच्या

थोडे आले

6-4 लसूण पाकळ्या

अर्धी वाटी हिरवी धणे

1 कप बेसन

1 टीस्पून वाळलेल्या कैरी पावडर किंवा चाट मसाला

1 टीस्पून मिरची पावडर

अर्धा टीस्पून हळद पावडर

अर्धा टीस्पून अजवाईन

चवीनुसार मीठ

तळण्यासाठी तेल

कारल्याचा कडूपणा कसा काढायचा?

कारल्याची टिक्की बनवण्यापूर्वी त्यातील कडूपणा काढून टाका. यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. कडवटपणा कमी करण्यासाठी कारल्याची साल सोलून त्यावर कोरडे पीठ आणि मीठ लावून तासभर बाजूला ठेवा आणि नंतर धुवून घ्या. कारल्याला मधून चिरुन तांदळांच्या पाण्यात अर्धा तास भिजत ठेवा. यामुळे कारल्याचा कडूपणाही कळणार नाही. कारले बनवण्याआधी ते कापून मिठाच्या पाण्यात भिजवल्यास कारल्याचा कडूपणा दूर होतो.

कारल्याची टिक्की बनवण्याची पद्धत :

कारल्याचा कडूपणा काढून त्याच्या बिया वेगळ्या केल्यावर किसून घ्या. यानंतर त्यात मीठ टाकून 20 मिनिटे ठेवा. 20 मिनिटांनी हाताने पिळून घ्या आणि नंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला लसूण आणि कोथिंबीर घालून हाताने चांगले मिसळा. या मिश्रणातील सर्व पाणी पिळून काढण्याचा प्रयत्न करा, त्यानंतर त्यात किसलेले पनीर घाला. पनीर घातल्यानंतर या मिश्रणात मसाले घालून चांगले मिक्स करावे. त्यानंतर बेसन आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मिश्रणाचे छोटे छोटे गोल टिक्की करा आणि हलक्या हाताने दाबा, जेणेकरून टिक्की थोड्या सपाट होतील. आता कढईत तेल टाका आणि मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. कराल्याच्या टिक्कीला हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com