घरी बनवा बदाम-केळ्याची स्मूदी ; 10 मिनिटांत तयार होईल
Admin

घरी बनवा बदाम-केळ्याची स्मूदी ; 10 मिनिटांत तयार होईल

उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात निरोगी आणि 'थंड' करायची असेल, तर बदाम केळी स्मूदी हा उत्तम पर्याय असू शकतो.
Published by :
Siddhi Naringrekar

उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात निरोगी आणि 'थंड' करायची असेल, तर बदाम केळी स्मूदी हा उत्तम पर्याय असू शकतो. केळी आणि बदामापासून बनवलेली स्मूदी केवळ चवदारच नाही तर आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे.

बदाम केळी स्मूदी बनवण्यासाठी साहित्य

सोललेलं बदाम - 4-5

केळी चिरलेली - १ कप

दूध थंड - 1.5 कप

व्हॅनिला इसेन्स - 1/2 टीस्पून

खजूर - २

बर्फाचे तुकडे - 3-4

बदाम आणि केळी स्मूदी बनवण्यासाठी आधी बदाम रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. यानंतर दुसऱ्या दिवशी बदाम सोलून घ्या. यानंतर केळीची साल काढून त्याचे तुकडे करा. आता दोन खजूर घ्या, त्यांच्या बिया काढा आणि त्यांचे तुकडे करा. हे सर्व साहित्य एकत्र मिक्सर जारमध्ये ठेवा. यानंतर, जारमध्ये थंड दूध आणि व्हॅनिला इसेन्स घाला आणि सर्व साहित्य मिसळा.

स्मूदी मऊ आणि फेसाळ होईपर्यंत सर्व साहित्य एकत्र करावे लागेल. यानंतर एका भांड्यात बदाम-केळी स्मूदी काढा. आता भांड्यात 3-4 बर्फाचे तुकडे टाका आणि स्मूदी थोडावेळ राहू द्या जेणेकरून ते व्यवस्थित थंड होईल. आता सर्व्हिंग ग्लासमध्ये थंडगार स्मूदी घाला आणि सर्व्ह करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com