राखीपौर्णिमेच्या खास मुहूर्तावर बनवा नारळाची मलाई बर्फी; १० मिनिटात होईल तयार
Rakhi Purnima 2023 : राखीपौर्णिमा सण अगदी जवळ आला आहे. या दिवशी बहिणी प्रेम आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून भावाच्या मनगटावर राखी बांधतात. यावर्षी हा सण 30 ऑगस्ट 2023 रोजी साजरा होणार असून त्याची तयारी जोरात सुरू झाली आहे. इतर कोणत्याही भारतीय सणाप्रमाणे, मिठाई हे देखील राखीपौर्णिमेचे मुख्य आकर्षण आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही घरीही मिठाई बनवू शकता. आम्ही तुम्हाला फक्त 10 मिनिटांत घरी करू शकता अशी रेसिपी सांगणार आहोत. ती म्हणजेच नारळाची मलाई बर्फी.
साहित्य
दुध
साखर
बारीक किसलेले ताजे खोबरे
फ्रेश क्रीम/साजूक तूप
नारळाची मलाई बर्फी कृती
ही कृती सुरू करण्यासाठी, एका पॅनमध्ये दूध आणि साखर घ्या. साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत, अधूनमधून ढवळत कमी-मध्यम आचेवर शिजवा. यानंतर त्यात किसलेले ताजे खोबरे घालून चांगले मिसळा. लक्षात ठेवा नारळाचा तपकिरी भाग त्यात समाविष्ट करू नये, कारण त्याचा बर्फीच्या चवीवर परिणाम होऊ शकतो. नारळ सर्व दूध शोषून घट्ट होईपर्यंत ढवळत राहा. आता त्यात थोडी क्रीम घाला.
जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही साजूक तूपही देखील घालू शकता. आता मिश्रण घट्ट होऊन आकार घेईल. गॅस बंद करून, एका प्लेटला तुपाने ग्रीस करून घ्या आणि त्यात तयार बर्फीचे मिश्रण टाका. स्पॅटुलाच्या मदतीने प्लेटवर हे मिश्रण चांगले पसरवा आणि थोडा वेळ सेट होऊ द्या. यानंतर ते सुरीच्या साहाय्याने कापून आवडत्या सुक्या मेव्याने सजवा.