Ragi Chips Recipe: हेल्दी असे नाचणी चिप्स; मनही भरेल आणि डाएटही होणार नाही ब्रेक
जर तुम्ही डाएटवर असाल आणि मध्येच तुम्हाला मस्त तळलेले पदार्थ पदार्थ खावेसे वाटत असेल पण डाएट ब्रेक करायचं नाही तर तुमच्यासाठी आमच्याकडे हेल्दी पदार्थ आहे ज्याने तुमच मनही भरेल आणि डाएटही ब्रेक होणार नाही. तुम्ही हेल्दी असे नाचणीचे चिप्स खाऊ शकता. नाचणी चिप्सची टेस्ट मस्तच असते. पण फार महत्वाची गोष्ट अशी, तुमचे वजन कमी होण्यास ही मदत होईल.
साहित्य-
एक कप चाचणी पीठ
1/4 गव्हाच पीठ
एक चमचा लाल तिखट
चवीनुसार मीठ
पाणी
तेल गरजेनुसार
माइक्रोवेव
बेकिंग ट्रे
कृती
सर्वात प्रथम एका भांड्यात नाचणी आणि गव्हाचे पीठ, मीठ, लाल तिखट टाका. आता त्यात एक चमचा तेल ही टाकून पीठ मळून घ्या. मळलेले पीठ 10-15 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा. त्यानंतर लहान-लहान पीठाचे गोळे तयार करा. या गोळ्यांपासून गोलाकार चपाती तयार करा आणि चाकूच्या मदतीने लहानलहान आकाराचे चौकोन काप तयार करा. त्यानंतर सर्व चिप्सवर ब्रशने थोडंथोडं तेल लावा. याच दरम्यान माइक्रोवेव 10 मिनिटांसाठी 180 डिग्री सेंटीग्रेडवर प्री-हिट करुन घ्या. आता बेकिंग ट्रे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर त्यावर हे सर्व चिप्स ठेवा. जवळजवळ 14 मिनिटांपर्यंत ते बेक करा. सुरुवातीच्या 7 मिनिटांमध्ये एका बाजूने ते बेक करुन घ्या. त्याननंतर दुसऱ्या बाजूने. अशा प्रकारे दोन्ही बाजू प्रत्येकी 7-7 मिनिटे बेक करा. अशाप्रकारे तयार होईल तुमचे स्वादिष्ट असे नाचणीचे चिप्स.