संध्याकाळच्या स्नॅकमध्ये व्हेज कबाब रोल पराठा सर्व्ह करा, जाणून घ्या चविष्ठ रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅकमध्ये व्हेज कबाब रोल पराठा सर्व्ह करा, जाणून घ्या चविष्ठ रेसिपी

जर तुम्ही संध्याकाळी तुमची भूक शमवण्यासाठी हेल्दी पर्याय शोधत असाल तर ही रेसिपी व्हेज कबाब रोल पराठा करुन पहा. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया व्हेज कबाब रोल पराठा कसा बनवला जातो.
Published by :
Siddhi Naringrekar

जर तुम्ही संध्याकाळी तुमची भूक शमवण्यासाठी हेल्दी पर्याय शोधत असाल तर ही रेसिपी व्हेज कबाब रोल पराठा करुन पहा. चला तर मग विलंब न लावता जाणून घेऊया व्हेज कबाब रोल पराठा कसा बनवला जातो.

व्हेज कबाब रोल पराठा बनवण्यासाठी साहित्य-

- 2 कप सोयाबीन

- चार तुकडे ब्रेड स्लाइस पावडर

- दोन चमचे व्हिनेगर

- दोन चमचे लसूण पेस्ट

- टीस्पून काळी मिरी पावडर

- लाल तिखट (आवश्यकतेनुसार)

- मीठ (चवीनुसार).

-दोन कांदे

- हिरवी मिरची बारीक चिरून

- दोन कप गव्हाचे पीठ

- तेल (आवश्यकतेनुसार)

व्हेज कबाब रोल पराठा बनवण्यासाठी प्रथम सोयाबीन पाण्यात भिजवून दीड तास ठेवा. यानंतर भिजवलेले सोयाबीन चांगले पिळून घ्या आणि एका भांड्यात सोयाबीन, लसूण पेस्ट, लाल तिखट, काळी मिरी पावडर, मीठ, हिरवी मिरची, व्हिनेगर घालून चांगले मिक्स करा. आता या मिश्रणापासून छोटे कबाब बनवा आणि तासभर फ्रीजमध्ये ठेवा.

यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यात तेल गरम करून कबाब सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. आता एका भांड्यात मैदा, मीठ आणि दोन चमचे तेल टाका, ते चांगले मिसळा आणि झाकून ठेवा. आता या पीठातून रोटी लाटून झाल्यावर तव्यावर तेल गरम करून रोटी दोन्ही बाजूंनी चांगली भाजून घ्या. पराठा शिजल्यावर त्यावर कबाबचे मिश्रण पसरवून रोल बनवा. यानंतर त्यात हिरव्या कोथिंबीरीची चटणीसोबत रोल सर्व्ह करा.

संध्याकाळच्या स्नॅकमध्ये व्हेज कबाब रोल पराठा सर्व्ह करा, जाणून घ्या चविष्ठ रेसिपी
बनवा पालक आलू टिक्की रेसिपी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com