मांजरीचे रडणे वाईट का मानले जाते?

मांजरीचे रडणे वाईट का मानले जाते?

शकुन शास्त्रानुसार मांजर घरातून बाहेर पडून रडत असेल तर ते खूप वाईट अशुभ मानले जाते. मांजरीचे रडणे हे सूचित करते की घरातील सदस्यांवर काही मोठे संकट येणार आहे.

शकुन शास्त्रानुसार मांजर घरातून बाहेर पडून रडत असेल तर ते खूप वाईट अशुभ मानले जाते. मांजरीचे रडणे हे सूचित करते की घरातील सदस्यांवर काही मोठे संकट येणार आहे. आपल्या आयुष्यात घडणार्‍या अनेक घटनांना शुभ आणि अशुभशी जोडून पाहिले जाते. शकुन शास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या शुभ आणि अशुभ दर्शवतात. शकुन शास्त्रात मांजरीचे रडणे अशुभ मानले जाते. मांजरीचे रडणे अनेक अशुभ चिन्हे देते.

मांजरीचे रडणे सूचित करते की काहीतरी चुकीचे आहे. असे मानले जाते की मांजरी घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. तंत्र-मंत्राचे पालन करणारे मांजरीला काळ्या शक्तीचे प्रतीक मानतात. घरात मांजराचा वारंवार प्रवेश करणे अशुभ मानले जाते. मांजराच्या रडण्याचा आवाज खूप भीतीदायक आहे. त्यामुळे मनात भीती निर्माण होते. घरात मांजर रडायला लागली तर घरातील कोणत्याही सदस्यासोबत काही तरी अनुचित प्रकार घडणार असल्याचे मानले जाते.

असे मानले जाते की मांजरीला भविष्यातील घटनांची कल्पना येते. मांजरी आपापसात भांडणे पैशाचे नुकसान आणि कौटुंबिक भांडण दर्शवते.मांजरीने डाव्या बाजूने रस्ता ओलांडणे देखील अशुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे तुम्ही ज्या कामासाठी जात आहात ते यशस्वी होणार नाही. मांजर येऊन घरात ठेवलेले दूध गुपचूप प्यायले तर ते संपत्तीच्या नाशाचे लक्षण आहे. दुसरीकडे, दिवाळीच्या दिवशी मांजर घरात प्रवेश करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे वर्षभर घरात संपत्ती येते.

Lokshahi
www.lokshahi.com