सुझुकीने भारतात केली 40 वर्ष पूर्ण! लॉन्च करणार आणखी एक कंपनी

सुझुकीने भारतात केली 40 वर्ष पूर्ण! लॉन्च करणार आणखी एक कंपनी

सुझुकीने भारतात 40 वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंपनीच्या गुजरातमधील हंसलपूर येथे इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि खरखोडा, हरियाणा येथे पॅसेंजर व्हेईकल प्लांटची पायाभरणी केली.
Published by :
Siddhi Naringrekar

सुझुकीने भारतात 40 वर्षे पूर्ण केले आहेत. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंपनीच्या गुजरातमधील हंसलपूर येथे इलेक्ट्रिक व्हेईकल बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आणि खरखोडा, हरियाणा येथे पॅसेंजर व्हेईकल प्लांटची पायाभरणी केली. भारतात मारुती उद्योग लिमिटेडची स्थापना सन 1981 मध्ये झाली होती. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी होती. 1982 मध्ये जपानी वाहन उत्पादक कंपनी सुझुकीने मारुतीसोबत एक संयुक्त उपक्रम सुरु केला. गेल्या चाळीस वर्षांत मारुती सुझुकी हा देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला आहे. आरसी भार्गव हे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आहेत.

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने (MSI) देशांतर्गत बाजारपेठेतील 50 टक्के हिस्सा परत मिळवण्याचे लक्ष ठेवले आहे. यावेळी बोलताना आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले की, मारुती सुझुकीचे यश भारत आणि जपानमधील मजबूत भागीदारी देखील दर्शवते. गेल्या आठ वर्षांत ही भागीदारी आणखी मजबूत झाली. ते म्हणाले की, भारत इलेक्ट्रिक वाहनांच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. या मोहिमेत सरकारही प्रोत्साहन देत मदत करत आहे. तसेच ते म्हणाले की, गुजरातमध्ये सुझुकी व्यतिरिक्त आणखी 125 जपानी कंपन्या आहेत. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष टी. सुझुकी यांनी सांगितले की, ते भारतात सुझुकी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर इंडिया नावाची दुसरी कंपनी सुरू करणार आहेत. ही सुझुकी जपानची पूर्ण मालकीची कंपनी आहे.

कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आरसी भार्गव म्हणाले की, मारुती मागे हटणार नाही आणि बाजारातील 50 टक्के हिस्सा परत मिळवण्यासाठी संघर्ष करेल. मारुती देशात आपल्या कार्याची 40 वर्षे साजरी करत आहे. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये कंपनीचा बाजार हिस्सा 43.38 टक्क्यांवर घसरला, जो 2018-19 या आर्थिक वर्षातील 51.21 टक्क्यांच्या शिखरावर होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com