#BOYCOTTSonyTV
#BOYCOTTSonyTVTeam Lokshahi

या कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतय #BOYCOTTSonyTV

एपिसोडमध्ये, मारेकऱ्याचे नाव आफताबवरून बदलून मिहीर असे करण्यात आले आणि पीडितेचे नाव श्रद्धा वालकरवरून बदलून अॅना फर्नांडिस करण्यात आले.

शनिवारी सोनी टीव्ही सोशल मीडियाच्या स्कॅनरखाली आला आणि श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा विपर्यास केल्याबद्दल नेटिझन्सनी टीव्ही चॅनेलवर टीका केली. #BOYCOTTSonyTV ने शनिवारी इंटरनेट तोडले आणि ट्विटरवर टॉप ट्रेंडिंग सुरू केले. चाहत्यांच्या मते, सोनी टीव्हीने आपल्या टीव्ही शो क्राईम पेट्रोलच्या माध्यमातून खळबळजनक श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा विपर्यास केल्याचा आरोप आहे.

चाहत्यांनुसार क्राईम पेट्रोलच्या २१२ भागामध्ये श्रद्धा आणि आफताबबद्दल होते. एपिसोडमध्ये, मारेकऱ्याचे नाव आफताबवरून बदलून मिहीर असे करण्यात आले आणि पीडितेचे नाव श्रद्धा वालकरवरून बदलून अॅना फर्नांडिस करण्यात आले. हा कार्यक्रम 27 डिसेंबर 2022 रोजी प्रसारित झाला आणि तेव्हापासून चाहते ट्विटरवर टीव्ही चॅनेलचा विरोध करत आहे. त्याचे भागाचे नाव क्राईम पेट्रोल 2.0 'अहमदाबाद-पुणे' मर्डर आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com