Health
HealthTeam Lokshahi

पायाच्या समस्यांमुळे चिंतीत आहात का? घरगुती उपाय म्हणून या तेलाचा करा वापर...

आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपण पायाला मसाज करण्यासाठी कोणते तेल वापरावे हेच कळत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत.
Published by :

आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात आपण पायाला मसाज करण्यासाठी कोणते तेल वापरावे हेच कळत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला याबद्दल काही सिक्रेट गोष्टी सांगणार आहोत. पायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास पाय सुंदर तर बनतातच परंतु आरोग्याशी संबंधित समस्यांवरही मात करता येते. म्हणून या समस्यांबद्दल जाणून घेणे अगदी महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत की पायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने कोणते फायदे होतात.

Health
काजू खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यचकित फायदे

पायांना तेलाने मसाज करा.

  • जर तुम्ही झोपेच्या समस्येने त्रस्त असाल किंवा तुम्हाला रात्री वेळेवर झोप येत नसेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाने पायांना मालिश करू शकता. 5 ते 10 मिनिटे मसाज केल्याने झोपेची समस्या तर दूर होतेच पण निद्रानाशामुळे होणाऱ्या समस्यांपासूनही आराम मिळतो.

  • जर तुम्ही तणाव आणि चिंताग्रस्त असाल तर डोक्याला मोहरीच्या तेलानेही मसाज करू शकता. असे केल्याने तणाव तर दूर होतोच पण मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने चिंतेशीही लढा देऊ शकता.

  • पायांना मोहरीच्या तेलाने मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारते. यासोबतच संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाहही योग्य प्रकारे होतो.

  • जर तुमचे पाय दुखत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे मोहरीच्या तेलाने नियमित मसाज करा. असे केल्याने फायदा होऊ शकतो.

  • अडकलेल्या शिरा आणि अडथळे उघडण्यासाठीही मोहरीचे तेल खूप उपयुक्त ठरू शकते. अशा स्थितीत रात्री झोपण्यापूर्वी मोहरीच्या तेलाने मालिश करावी.

  • जर तुम्हाला सांधे मजबूत ठेवायचे असतील आणि सांध्यांच्या समस्या दूर करायच्या असतील तर मोहरीच्या तेलाने मसाज करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com