YouTubeचा मोठा निर्णय, भारतात 29 लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ डिलिट, लाखो चॅनलही बंद

YouTubeचा मोठा निर्णय, भारतात 29 लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ डिलिट, लाखो चॅनलही बंद

अधिक व्हिडीओ डिलिट करणारा भारत देश अग्रस्थानी
Published by :
Team Lokshahi
Published on

युट्यूबच्या नवीन गाईडलाईन्स च्या रिपोर्टनुसार भारताने पुन्हा एकदा अधिक व्हिडीओ हटवणाऱ्या यादीमध्ये पहिले स्थान मिळवले आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 च्या दरम्यानचे 29 लाखांपेक्षा अधिक व्हिडीओ गाईडलाईन्सचे उल्लंघन केल्यामुळे हटवण्यात आले आहेत.

गुगलची मालकी असलेल्या कंपनीने सांगितले की, "युट्यूबच्या कम्युनिटी गाईडलाईन्स जगभरात लागू करण्यात आले आहेत. जेव्हा यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यामुळे एखादा कंटेन्ट हटवला जात असेल तर तो संपूर्ण जगभरातून हा व्हिडीओ हटवला जाईल. YouTube च्या मते, बहुतेक व्हिडिओ स्वयंचलित सिस्टमद्वारे ओळखले जातात, परंतु काही ह्युमन फ्लॅगर्सदेखील रिपोर्ट करतात.

आकडेवारीनुसार, मागील तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत व्हिडिओ हटवण्यामध्ये 32% वाढ झाली आहे. 2020 पासून भारत सतत या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तसेच ब्राझील 1 दशलक्षाहून अधिक व्हिडिओ काढून टाकून दुसऱ्या क्रमांकावर आहे.

YouTube ने सांगितले की, "स्पॅम, चुकीची माहिती आणि फसवणूक (81.7%) व्हिडिओ काढून टाकण्याचे मुख्य कारण होते. याव्यतिरिक्त, छळ (6.6%), मुलांची सुरक्षा (5.9%) आणि हिंसक सामग्री (3.7%) यासारख्या इतर कारणांसाठी व्हिडिओ देखील काढले गेले. याच काळात 48 लाख (4.8 दशलक्ष) हून अधिक चॅनेल बंद करण्यात आले".

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com