अशी आहे उद्धव आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी

अशी आहे उद्धव आणि रश्मी ठाकरेंची लव्ह स्टोरी

शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. उध्दव ठाकरेंच्या प्रत्येक पावलावर पत्नी रश्मी ठाकरे यांनी भक्कमपणे साथ दिली.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. उध्दव ठाकरेंच्या प्रत्येक पावलावर पत्नी रश्मी ठाकरे यांनी भक्कमपणे साथ दिली. उद्धव ठाकरे यांच्या आजच्या राजकीय यशामध्ये त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. या दोघांची भेट झाली कशी, हे फार कमी जणांना माहित आहे.

रश्मी ठाकरे यांचे माहेरचे आडनाव पाटणकर. डोंबिवलीतील एका सामान्य कुटुंबात रश्मी ठाकरेंचा जन्म झाला होता. वडीलांचा व्यवसाय असतानाही स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी रश्मी ठाकरे एलआयसीमध्ये नोकरी करत होत्या.

या नोकरी दरम्यान त्यांची ओळख राज ठाकरे यांच्या बहिण जयवंती ठाकरे यांच्याशी झाली. जयवंती यांच्या माध्यमातून रश्मी यांची ओळख उध्दव ठाकरेंशी झाली.

त्यावेळी उध्दव ठाकरे राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांना फोटोग्राफीत आवड होती. त्यांनी एक जाहिरात एजन्सीही सुरु केली होती.

रश्मी आणि उद्धव यांची ओळख पुढे मैत्रीत बदलली. व भेटीगाठी वाढल्या. उद्धव ठाकरे रश्मी यांना भेटण्यासाठी लोकलने प्रवास करून डोंबिवलीला जायचे, असे म्हंटले जाते. नंतर मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.

रश्मी आणि उध्दव ठाकरे यांच्या लग्नाला सुरुवातीला घरच्यांचा विरोध होता. परंतु, कालातंराने त्यांच्या नात्याला घरच्यांनीही सहमती दिली आणि १३ डिसेंबर १९८८ ला दोघांचे लग्न झाले.

शिवसेनेची धुरा हाती घेतल्यापासून उद्धव ठाकरे यांनी अनेक कसोटीचे क्षण अनुभवले. या सर्व कठीण काळात उद्धव ठाकरे यांना पत्नी रश्मी यांनी खंबीर साथ दिली.

शिवसेनेच्या कठीण काळात पक्षाला बांधून ठेवण्यात रश्मी ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिंदे गटाच्या बंडाळीनंतरही रश्मी ठाकरे अॅक्टीव्ह दिसत होत्या.

उध्दव आणि रश्मी यांना आदित्य आणि तेजस दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे राजकारणात सक्रीय असून माजी पर्यावरणमंत्री आहे. मात्र, तेजस ठाकरे राजकारणात फारसे सक्रीय दिसून येत नाहीत. ‘ठाकरे वाइल्ड फाउंडेशन’ चे संस्थापक तेजस उद्धव ठाकरे आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com