Hair Fall Remedies : केस गळतीने त्रस्त आहात? करा 'हे' घरगुती सोपे उपाय
Google

Hair Fall Remedies : केस गळतीने त्रस्त आहात? करा 'हे' घरगुती सोपे उपाय

Published by :
Siddhi Naringrekar

अनेकजण केस गळतीच्या समस्येने हैराण असतात. केस गळती थांबण्यासाठी अनेक उपाय केले जातात. हवामानातील बदल, योग्य आहाराचा अभाव, प्रदूषण किंवा हेअर प्रोडक्टचा अतिवापर अशा अनेक कारणांनी केस गळतीची समस्या होत असते. मजबूत केस सर्वांनाच हवे असतात. मात्र त्यांची तशी काळजी घेणं देखील खूप गरजेचं आहे. चला तर आज जाणून घेऊया केस गळती थांबण्यासाठी काही घरगुती उपाय

1. तेल मसाज

Google

नियमित तेलाच्या मालिशमुळे टाळूची कोरडी त्वचा निघून जाण्यास मदत होते. हलक्या हाताने केसांना तेल मालिश करावे. असे केल्यास केसांची मुळे मजबूत होऊन वाढीस मदत होते आणि केस गळती थांबण्यास देखील मदत होते.

2. कांद्याचा रस

Google

केस गळतीवर कांद्याचा रस खूप फायदेशीर ठरतो. अंघोळीच्या आधी कांद्याचा रस टाळूवर लावून ठेवा आणि थोड्यावेळानंतर केस स्वच्छ धुवा, असे केल्यास केसांना याचा खूप फायदा होतो.

3. मेथीचे दाणे

Google

मेथीच्या दाण्यांची पेस्ट करून ती केसांना लावल्याने केसगळती आणि केस तुटणे यासारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी फायदेशीर आहे.

4. कोरफड

Google

कोरफड केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीचा गर केसांना लावावा आणि थोड्यावेळानंतर धुवावा. असे केल्यास केस गळणे थांबते तसेच केस चमकदार होतात.

5. कढीपत्ता

Google

कढीपत्ता हा केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो. ज्या लोकांना केस गळतीची समस्या आहे अशा लोकांनी तेलात कढीपत्ता गरम करून तयार केलेले तेल केसांना लावावे. असे केल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com