ओठ फुटण्याच्या समस्येने हैराण आहात का? करा 'हे' उपाय
Google

ओठ फुटण्याच्या समस्येने हैराण आहात का? करा 'हे' उपाय

Published by :
Siddhi Naringrekar

ओठ कोरडे आणि फुटण्याच्या समस्येने अनेकजण हैराण असतात. ओठ फुटल्याने त्यातून रक्त देखील येते. ओठ फुटणे ही एक सामान्य समस्या आहे. थंडीमध्ये तर बऱ्याच जणांचे ओठ फुटतात. ओठ फुटल्यामुळे वेदनाही खूप होतात. चला तर जाणून घेऊया या पदार्थांचा वापर करून तुम्ही फुटलेल्या ओठांच्या समस्येपासून आराम मिळवू शकता.

1. भरपूर पाणी पिणे

Google

भरपूर पाणी पिणे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचं आहे. भरपूर पाणी प्यायल्याने हायड्रेटेड राहतात. ओठ फुटण्याची समस्या दूर करण्यासाठी भरपूर पाणी पिणे उपयुक्त आहे.

2. नारळाचे तेल

Google

खोबरेल तेलाचा वापर आपण फुटलेल्या ओठांवर करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर नारळाचे तेल लावल्याने ओठ मऊ होण्यास मदत होते आणि ओठ फुटण्याची समस्या कमी होते.

3. तूप

Google

तूप आपल्या आरोग्सायाठी खूप फायदेशीर आहे. कोरड्या, फुटलेल्या ओठांवर तूप लावल्याने ओठ मऊ होतात. ओठांना तूप लावून मसाज केल्याने ओठ फुटण्याची समस्या कमी होते. ओठांचा काळेपणा देखील कमी होण्यास मदत होते.

4. दुधाची साय

Google

दुधाची साय फुटलेल्या ओठांना लावल्याने आराम मिळतो. तसेच ओठांची चमक वाढते. दुधाची साय ओठांवर लावून हलक्या हाताने चोळावे असे केल्यास ओठांवरील कोरडेपणा देखील दूर होण्यास मदत होते.

5. लोणी

Google

ओठांना लोणी लावण्याचे अनेक फायदे आहेत. लोणी ओठांमधील ओलावा टिकवून ठेवते. ओठांना नियमित लोणी लावल्याने ओठ फुटण्याची समस्या कमी होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com