Acidity
Acidity

Acidity : ॲसिडिटीमुळे हैराण आहात?; मग ‘हे’ 5 पदार्थ खायला लगेच सुरू करा

अनेकजण ॲसिडिटीमुळे खूप हैराण असतात.
Published by :
Siddhi Naringrekar

(Acidity) अनेकजण ॲसिडिटीमुळे खूप हैराण असतात. तळेलेल आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ॲसिडिटी होते. छातीत जळजळ, आंबट ढेकर येणे, पोट फुगणे अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कधीही काहीही खाणं, झोप पूर्ण न होणे. रात्री उशिरापर्यंत जागणं यामुळे ॲसिडिटी होते. ॲसिडिटी ही पचनसंस्थेतील एक सामान्य समस्या आहे. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते पदार्थ आहेत. जे तुम्हाला ॲसिडिटीपासून आराम देऊ शकतात.

1. ताक

Google

ताक आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर एक ग्लास ताक पिल्यास पचनासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. ताक शरीरातील उष्णता कमी करतं आणि अ‍ॅसिडिटीपासून सुटका मिळते.

2. थंड दूध

Google

दूध शरीराला थंडावा देते. दूध पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करते. त्यामुळे अ‍ॅसिडिटी झाल्यास थोडेसे थंड दूध पिणे फायदेशीर ठरू शकते.दुधामध्ये असलेला कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे देखील मजबूत होतात. अ‍ॅसिडिटी असलेल्यांनी रोज थंड दूध प्यावे.

3. केळं

Google

केळं आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. केळी खाल्ल्याने ऊर्जा मिळते यासोबतच पचन सुधारते. अ‍ॅसिडिटी आणि छातीत जळजळ कमी करण्यास मदत करते.

4. ओव्याचं पाणी

Google

पोटाच्या समस्यांसाठी ओव्याचे पाणी उत्तम पर्याय आहे. सकाळी रिकाम्या पोटी ओव्याचे पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. पोटातील गॅस व जळजळ ओव्याच्या पाण्यामुळे कमी होते.

5. तुळशीची पाने

Google

रिकाम्या पोटी नियमित तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ राहते. अ‍ॅसिडिटी झाल्यास तुळशीच्या पाने खाल्ल्यास पोटातील जळजळ थांबण्यास मदत होते. तुळशीच्या पानांचा काढा करून देखील तुम्ही पिऊ शकता

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com