Dental Health :  दात ठणकतोय? करा 'हे' घरगुती उपाय; मिळेल आराम
Google

Dental Health : दात ठणकतोय? करा 'हे' घरगुती उपाय; मिळेल आराम

Published by :
Siddhi Naringrekar

दात हा आपल्या शरीराचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. दातांची काळजी घेणं आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे. खूप थंड किंवा पदार्थ खाल्ले तर त्याचा दातांवर खूप वाईट परिणाम होतो. अनेकजण दातदुखीच्या समस्यांमुळे त्रस्त असल्याचे पाहायला मिळतात. दात दुखीच्या त्रासावर अनेकजण वेगवेगळे उपाय करतात, औषधे घेतात. मात्र त्याने तेवढ्यापुरती दातदुखी थांबते. चला तर मग जाणून घेऊया असे काही घरगुती उपाय जे केल्याने दातदुखीच्या समस्येपासून आराम मिळेल.

1. लवंग तेल

Google

दातदुखीवर लवंगाचे तेल खूप फायद्याचे आहे. दातदुखीचे तेल वेदना करण्यास मदत करते. कापसावर लवंगाचे तेल घ्यावे आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी ठेवावे त्याने आराम मिळतो.

2. मिठाच्या पाण्याने गुळण्या

Google

दात दुखत असल्यास मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे फायद्याचे ठरते. असे केल्यास दातांमधील कीड निघून जाण्यास मदत होते

3. बर्फ

Google

बर्फ हा खूप दातदुखीसाठी खूप महत्वाचे ठरतो. ज्या ठिकाणी वेदना होत आहे त्या ठिकाणी गालाला आईस पॅकचा शेक द्यावा. बर्फाने शेक दिल्यास सूज कमी होण्यास मदत होते.

4. आलं

Google

आलं दातदुखी थांबविण्यासाठी उपयुक्त ठरते. दात दुखत असेल तर आल्याचा लहान तुकडा दाताखाली थोड्यावेळ चावून धरा. असे केल्यास दातदुखी थांबविण्यासाठी मदत होईल.

5. हळद आणि मीठ पेस्ट

Google

हळद आणि मीठ एकत्र करून पेस्ट बनवून दुखत असलेल्या ठिकाणी लावल्यास दात दुखणे थांबण्यास मदत होते. असे केल्यास सूज आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com