Oily Skincare tips : चेहरा तेलकट दिसतोय? हे सोपे उपाय करा आणि मिळवा चमकदार त्वचा
Google

Oily Skincare tips : चेहरा तेलकट दिसतोय? हे सोपे उपाय करा आणि मिळवा चमकदार त्वचा

Published by :
Siddhi Naringrekar

अनेकांना तेलकट त्वचेची समस्या असते. ही एक सामान्य समस्या आहे. चेहरा सारखा तेलकट झाल्याने त्यावर धुळीचे कण चिकटून राहतात .ज्यामुळे पिंपल्स येतात, खाज सुटते, चेहरा काळपट वाटतो. हवामानातील बदलांमुळे देखील चेहरा तेलकट दिसू लागतो. अनेकांना तेलकट त्वचेची समस्या भेडसावत असते. यावर अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. तेलकट त्वचा असलेल्या लोकांनी योग्य उपाय केल्यास त्वचा चमकदार बनू शकते.योग्य आहार, नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे. आता आम्ही तु्म्हाला काही उपाय सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया

1. कोरफड

Google

कोरफड चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्याला कोरफडीचा गर लावावा आणि थोड्यावेळानंतर तो धुवून टाकावा. असे केल्यास तेलकटपणा कमी होण्यास मदत होते.

2. योग्य आहार

Google

आपला आहार हा योग्य असणे गरजेचं आहे. आहारात तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळणे गरजेचं आहे. मसालेदार आणि तेलकट पदार्थामुळे चेहरा तेलकट होतो

3. भरपूर पाणी पिणे

Google

आपल्या शरीरासाठी पाणी खूप आवश्यक आहे. त्वचा चमकदार राहते. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा कोरडी न पडता ओलसर राहते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. ज्यामुळे मुरुमे पुरळ कमी होतात

4. चेहरा नियमित धुणे

Google

चेहरा नियमित धुणे गरजेचं आहे. दिवसातून दोनदा चेहरा धुणे आवश्यक असून त्यामुळे चेहऱ्यावरील घाणं निघून जाण्यास मदत होते. त्वचेचे हायड्रेशन टिकून राहते. त्वचेवरील धूळ, अतिरिक्त तेल निघून जाण्यास मदत होते

5. काकडीचा रस

Google

काकडीचा रस चेहऱ्यासाठी फायद्याचा आहे. काकडीतील भरपूर पाण्याचे प्रमाण चेहऱ्याला थंडावा देते. काकडीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा हायड्रेटेड राहते. त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com