detox drinks
detox drinksGoogle

Detox Drinks : 'हे' डिटॉक्स ड्रिंक्स प्या, जे शरीर ठेवतील तंदुरुस्त

Published by :
Siddhi Naringrekar

डिटॉक्स ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास हे डिटॉक्स ड्रिंक्स खूप मदत करतात. यामुळे अनेक फायदे शरीराला होतात. डिटॉक्स ड्रिंक्स चयापचय वाढवण्यास मदत करतात. यासोबतच त्वचेची चमक वाढते, त्वचा हायड्रेटेड राहते, पचक्रिया सुधारते. डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने शरीरात ऊर्जा राहते ज्यामुळे दिवसभर फ्रेश वाटते. शरीरातील थकवा निघून जातो आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया असे कोणते डिटॉक्स ड्रिंक्स आहेत ज्याने शरीराला फायदा होतो.

1. बडीशेपचे पाणी

Google

बडीशेपचे पाणी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत होते

2. लिंबू आणि कोमट पाणी

Google

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप फायदेशीर आहे. लिंबू आणि कोमट पाणी पिल्याने पचन सुधारण्यासाठी मदत होते. कोमट लिंबू पाणी प्यायल्याने ताजेतवाने वाटते

3. आले आणि पुदिना पाणी

Google

आले आणि पुदिनाचे पाणी प्यायल्याने शरीराला फायदा होतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आणि त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी मदत करते. चयापचय क्रिया वेगवान होते. पचनक्रिया सुधारण्यासाठी खूप मदत होते

4. काकडी आणि पुदिन्याचं पाणी

Google

काकडी आणि पुदिन्याचं पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहतं. शरीरातील पाण्याची पातळी वाढते. पुदिना पचनासाठी खूप चांगला असल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. हे पाणी शरीर थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी चांगले आहे

5. ग्रीन टी

Google

ग्रीन टी पिणे शरीरासाठी फायदेशीर असून वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरातील हानिकारक घटक बाहेर टाकले जातात. कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com