पोटाचा घेर कमी करण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ
Google

पोटाचा घेर कमी करण्यासाठी रोज खा 'हे' 5 पदार्थ

Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अनेकजण वजन कमी करण्यासाठी काही ना काही उपाय करत असतात, आहारात बदल करतात. अनेकजण जिमला जाणं पसंत करतात. मात्र फक्त व्यायाम करणं पुरेसे नसते तर त्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं असते. योग्य आणि संतुलित आहार आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन वाढलं की अनेक आजाराच्या समस्या निर्माण होतात. अनेकजण वजन कमी करण्यासाठी डायटिंग देखील करतात, मात्र योग्य आहार घेणेच फायद्याचे ठरते. चला तर मग जाणून घेऊया कोणते पदार्थ आपल्या शरीराला फिट ठेवायला मदत करतात.

1) दूध

Milk
Milk Google

दूध आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. पोट भरलेले राहते त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.

2) पाणी

Water
Water Google

शरीराला पाण्याची गरज खूप जास्त असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास पोटाचा घेर वाढतो. पाणी शरीराला हायड्रेटेड ठेवते. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

3) बदाम

almonds
almondsGoogle

बदाम आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून रोज सकाळी भिजवलेले बदाम खाल्यास वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. बदामामध्ये महत्त्वाची खनिजे आढळतात.

4) डाळी

pulses
pulsesGoogle

डाळींमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे डाळींचा आहारात समावेश केल्यास शरीराला ते फायदेशीर ठरते आणि शरीराला ऊर्जा मिळते.

5) पनीर

paneer
paneerGoogle

पनीरमध्ये भरपूर प्रोटीन आणि कॅल्शियम असतं. जे वजन कमी करण्यास देखील फायदेशीर ठरते. हाडे मजबूत होतात. पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com