Health Tips
Health TipsGoogle

Health Tips : सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीऐवजी 'या' गोष्टी खा; फायदे जाणून घ्या

सकाळी नेमकं काय खायचे असा अनेकांना प्रश्न पडतो.
Published by :
Siddhi Naringrekar

सकाळी नेमकं काय खायचे असा अनेकांना प्रश्न पडतो. रोज रोज नवीन काय करायचे असे अनेक घरात म्हटले जाते . मात्र सकाळी तुम्ही जे काही खाता ते तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असते. चला तर जाणून घेऊया सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीऐवजी कोणते पदार्थ खाऊ शकता. जे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. जे दिवसभर शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात.

1. भिजवलेले बदाम

Google

बदाम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. आदल्या रात्री पाण्यात बदाम भिजत ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी ते खाणे शरीरासाठी खूप फायद्याचे ठरते. ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. बदामात अनेक पोषक घटक असतात. पचन सुधारण्यास देखील मदत होते.

2. ओट्स

Google

सकाळी नाश्ताला ओट्स खाऊ शकता. ओट्समध्ये भरपूर फायबर असते. ओट्स खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि पचनसंस्था निरोगी राहते. पोट देखील भरलेले राहते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

3. गरम पाणी आणि मध

Google

सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफीऐवजी गरम पाणी आणि मधाचे सेवन करा. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. गरम पाणी आणि मधाचे सेवन केल्याने त्वचा देखील चांगली राहते. गरम पाणी आणि मधाचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते तसेच पोट साफ देखील होते

4. पपई

Google

पपई खाणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे आहे. पपईमध्ये अनेक पोषक घटक आहेत. पपईचे सेवन केल्यास पोट चांगले राहते. पोट भरलेले राहते ज्यामुळे वजन देखील नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

5. ड्रायफ्रूट्स

Google

ड्रायफ्रूट्स हा पौष्टिकतेचा खजिना आहे. ड्रायफ्रूट्समध्ये प्रोटिन्स आणि फायबर असतात. ड्रायफ्रूट्स खाल्याने ऊर्जा मिळते. रात्रभर ड्रायफ्रूट्स भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास त्यामुळे भरपूर फायदे मिळतात.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com