Weight Loss : नाश्तामध्ये ‘हे’ पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात
Google

Weight Loss : नाश्तामध्ये ‘हे’ पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात

Published by :
Siddhi Naringrekar

आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक पदार्थ खूप महत्त्वाचे आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात वजन नियंत्रणात राहावे असे सर्वांना वाटत असते. वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. जिम, योगा, डायट प्लॅन असे सर्व उपाय केले जातात. मात्र यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे दिवसभरातील आपण काय खातो. आपल्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करतो. चला तर मग जाणून घेऊया की कोणते पदार्थ खाल्ल्यास आपले वजन नियंत्रणात राहू शकते.

1. भाज्यांचा दलिया

Google

भाज्यांपासून दलिया हा आरोग्यासाठी चांगला आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी हा पोषक पर्याय मानला जातो.

2. इडली-सांबार 

Google

इडली-सांबार हा नाश्तासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. इडली पचनासाठी अतिशय हलकी असते. यासोबतच सांबारमध्ये भाज्यांचा वापर पुरेपुर केलेला असतो. त्यामुळे इडली सांबारसोबत खाल्ल्यास हा संपूर्ण संतुलित आहार ठरतो. भाज्यांमधून फायबर, जीवनसत्त्वे व खनिजे मिळतात, तर डाळीमधून आवश्यक प्रोटीन मिळते.

3. डाळीचं धिरडं

Google

विविध डाळींपासून तयार केलेलं धिरडं प्रोटीनने भरलेलं असतं. नाश्त्याला हे धिरडं खाल्ल्यास पोट दीर्घकाळ भरलेलं राहते. त्यामुळे भूक लागत नाही आणि वजन देखील नियंत्रणात राहते.

4. पोहे किंवा उपमा

Google

पोहे किंवा उपमा हा नाश्तासाठी बेस्ट पर्याय आहे. पोहे आणि उपमा तयार करताना त्यामध्ये भरपूर भाज्या टाकून बनवल्यास ते जास्त पौष्टिक ठरते. पचनास हलके असते. ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

5. ओट्स

Google

ओट्समध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, यांसारख्या अनेक पोषक घटकांचा समावेश असतो. हे खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. नाश्तामध्ये ओट्सचा समावेश करणे हे जास्त फायदेशीर ठरू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com