सर्दीने नाक बंद झालं? करा 'हे' घरगुती उपाय मिळेल आराम
Google

सर्दीने नाक बंद झालं? करा 'हे' घरगुती उपाय मिळेल आराम

Published by :
Siddhi Naringrekar

सर्दीचा त्रास झाला की, डोकं दुखणे, नाक बंद होणे असा समस्या निर्माण होतात. यावर उपचार म्हणून अनेक औषध घेतली जातात. मात्र त्याने तेवढ्यापुरता आराम मिळतो. मात्र आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय केल्यास तुम्हाला या सर्दीपासून आराम मिळेल. सर्दी आणि नाक बंद होणे ही सामान्य समस्या आहे. मात्र यावर योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.

1. गरम पाणी

Google

सर्दी झाली असल्यास थंड पाण्यापेक्षा गरम पाणी प्यावे. गरम पाणी प्यायल्यास सर्दीपासून आराम मिळतो. दिवसभरात कोमट पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

2. गरम पाण्याची वाफ घेणे

Google

गरम वाफ घेणे सर्दीपासून सुटका करून घेण्यासाठी खूप आवश्यक आहे. सर्दी झाल्यावर गरम पाण्याची वाफ घ्यावी. असे केल्यास श्वास घेणे सोपे होते. एका भांड्यात पाणी गरम करा आणि टॉवेलने डोके व भांडे झाकून काही मिनिटे वाफ घ्या. सर्दीपासून आराम मिळेल.

3. गरम पदार्थ खाणे

Google

सर्दी झाली असल्यास गरम व पौष्टिक पदार्थ खाणे अत्यंत गुणकारी आहे. भाज्यांचे सूप प्यायल्यास सर्दीपासून आराम मिळतो.

4. निलगिरी तेल

Google

निलगिरी तेल सर्दीवर उपयुक्त आहे. सर्दी झाली असल्यास पाण्यात निलगिरी तेल टाकून त्याची वाफ घेतल्यास सर्दीला आराम मिळतो

5. तुळशीच्या पानांचे सेवन करा

Google

सर्दी झाल्यास तुळशीच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून त्याचे चाटण केल्यास नाक साफ होण्यास मदत होते. विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com