चहाची गाळणी काळी पडलीय? काही मिनिटांतच होईल स्वच्छ 'हे' उपाय करा
Google

चहाची गाळणी काळी पडलीय? काही मिनिटांतच होईल स्वच्छ 'हे' उपाय करा

चहा गाळण्यासाठी सर्वजण चहाच्या गाळणीचा वापर करतात.
Published by :
Siddhi Naringrekar

चहा गाळण्यासाठी सर्वजण चहाच्या गाळणीचा वापर करतात. मात्र या चहाच्या गाळणीचा रोज वापर केल्याने ती गाळणी हळूहळू काळी पडायला सुरूवात होते. चहा पावडरचे कण त्यामध्ये अडकून बसतात. चहाच्या गाळणीवर तेलकटपणा, काळे डाग पडू शकतात. रोज गाळणी साफ केली तरी ती पूर्ण स्वच्छ होत नाही. चला तर मग जाणून घेऊया चहाची गाळणी साफ करण्याचे उपाय

1. लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा

Google

लिंबांच्या रस आणि बेकिंग सोडा असे मिश्रण एकत्र करा आणि चहाच्या गाळणीवर हे मिश्रण टूथब्रशच्या मदतीने घासा आणि नंतर कोमट पाण्याने गाळणी स्वच्छ करा.

2. गरम पाणी

Google

चहाच्या गाळणीला कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. पाण्यात 5 मिनिटे ठेवल्याने चहाच्या गाळणीवरील काळे डाग निघून जाण्यास मदत होतात. चहाच्या गाळणीत अडकलेला चिकट थर स्वच्छ करण्यासाठी गरम पाणी खूप फायद्याचे ठरते

3. बेकिंग सोडा आणि कोमट पाणी

Google

गाळणीवर कोमट पाणी आणि 1 चमचा बेकिंग सोडा टाका. त्यानंतर 10–15 मिनिटांनी जुना टूथब्रशने घासा आणि स्वच्छ पाण्याने धुवा. असे केल्याने गाळणीवरील काळे डाग निघून जाण्यास मदत होते.

4. टूथपेस्ट

Google

गाळणीवर टूथपेस्ट लावून घासा आणि त्यानंतर गाळणीवरील चिकट थर निघून जाण्यास मदत होते.

5. लिंबू आणि मीठ

Google

चहाच्या गाळणी स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मीठ खूप उपयुक्त ठरते. गाळणीला थोडे मीठ लावा आणि लिंबू चोळा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. असे केल्याने गाळणीमध्ये अडकलेले चहा पावडरचे कण निघून जाण्यास मदत होईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com