Jackfruit : 'या' व्यक्तींनी अजिबात फणस खावू नये..

Jackfruit : 'या' व्यक्तींनी अजिबात फणस खावू नये..

फणस चवीला गोड आणि पौष्टिक फळ मानले जाते. त्यामध्ये शरीराला उपयोगी ठरणारी जीवनसत्त्वे, तंतुमय घटक आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.
Published by :
Riddhi Vanne

फणस चवीला गोड आणि पौष्टिक फळ मानले जाते. त्यामध्ये शरीराला उपयोगी ठरणारी जीवनसत्त्वे, तंतुमय घटक आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे पचन सुधारण्यास, हृदय निरोगी ठेवण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

1. पोषणमूल्यांनी भरलेला फणस

फणस चवीला गोड आणि शरीरासाठी उपयुक्त मानला जातो. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय घटक भरपूर असतात. त्यामुळे पचन सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते आणि हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

2. अॅलर्जी असलेल्यांनी घ्या काळजी

ज्यांना लेटेक्सची अॅलर्जी आहे त्यांनी फणस टाळावा. काहींना यामुळे श्वास घेण्यास त्रास किंवा त्वचेवर प्रतिक्रिया दिसू शकते.

3. मधुमेहींसाठी मर्यादा आवश्यक

फणस गोड असल्याने मधुमेह असणाऱ्यांनी तो जपून खावा. जास्त प्रमाणात खाल्ल्यास साखरेची पातळी बिघडू शकते.

4. गर्भवती आणि किडनी रुग्णांनी सावध राहा

गर्भावस्थेत किंवा मूत्रपिंडाच्या तक्रारी असणाऱ्यांनी फणस खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यातील काही घटक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात.

5. फणसाबरोबर काय टाळावे?

दूध, मासे किंवा मद्य यांसोबत फणस खाल्ल्यास अपचन, गॅस किंवा त्वचेच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे हे पदार्थ वेगवेगळेच सेवन करणे योग्य ठरते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com