The Habit Of Holding Urine For A Long Time Is Dangerous For The Body : लघवी थांबवण्याची सवय, किडनीसाठी धोक्याची घंटा!

The Habit Of Holding Urine For A Long Time Is Dangerous For The Body : लघवी थांबवण्याची सवय, किडनीसाठी धोक्याची घंटा!

The Habit Of Holding Urine For A Long Time Is Dangerous For The Body : निरोगी आयुष्य जगायचे असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात मूत्रपिंड म्हणजेच किडनी खूप महत्त्वाची भूमिका बजावते.
Published by :
Riddhi Vanne

The Habit Of Holding Urine For A Long Time Is Dangerous For The Body : निरोगी आयुष्य जगायचे असेल तर शरीरातील प्रत्येक अवयवाची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. त्यात मूत्रपिंड म्हणजेच किडनी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ती रक्तातील घाण, अतिरिक्त पाणी आणि नको असलेले द्रव्य वेगळे करून शरीराबाहेर टाकते. आजकालच्या धकाधकीच्या दिनचर्येमुळे अनेकदा लघवीची भावना झाली तरी आपण ती पुढे ढकलतो. ऑफिसमधील कामे, प्रवास किंवा योग्य सोय नसणे यामुळे ही सवय लागते. काहीजण तर आळसामुळेही लघवी रोखून ठेवतात. पण हीच सवय हळूहळू त्रासदायक ठरू शकते. लघवी जास्त वेळ थांबवल्यास मूत्राशय आणि किडनीवर ताण येतो. त्यामुळे संसर्ग, खडे तयार होणे किंवा इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच शरीराचा इशारा ओळखा आणि वेळेवर लघवी करा. छोटा बदल मोठ्या आजारांपासून वाचवू शकतो.

1. किडनीचे महत्त्व

आपल्या शरीरातील किडनी म्हणजे नैसर्गिक फिल्टर. ती रक्त स्वच्छ ठेवते आणि शरीरातील घाण व अनावश्यक द्रव्य लघवीद्वारे बाहेर टाकते. त्यामुळे किडनी निरोगी असणे खूप गरजेचे आहे.

2. लघवी रोखण्याची सवय

ऑफिस, प्रवास किंवा इतर कामांच्या गर्दीत अनेकदा लघवी आल्यावरही आपण दुर्लक्ष करतो. पण ही सवय हळूहळू आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

3. शरीरावर होणारा ताण

लघवी जास्त वेळ रोखून धरल्यास ती मूत्राशयात साठून राहते. त्यामुळे किडनी आणि मूत्रमार्गावर दबाव वाढतो. हा ताण दीर्घकाळ राहिला तर समस्या निर्माण होऊ शकतात.

4. संसर्गाचा धोका

लघवी वेळेवर न केल्यास जंतू वाढण्याची शक्यता वाढते. यामुळे युरिन इन्फेक्शन (UTI) होऊ शकते. लघवी करताना जळजळ, दुर्गंधी किंवा पोटदुखी अशी लक्षणे दिसू शकतात.

5. इतर गंभीर परिणाम

ही सवय कायम राहिली तर किडनी स्टोन, मूत्राशय कमजोर होणे किंवा किडनीला इजा होण्याचा धोका वाढतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com