Today’s Top Breaking News
TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW

Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.
Published by :
Dhanshree Shintre
1.

बॉलिवूडमध्ये दहशत माजली असून, चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबारानंतर आता अभिनेता रणवीर सिंह यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी व्हॉट्सअॅपवरून व्हॉइस नोटद्वारे देण्यात आली असून त्यात कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती, ज्यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले आहेत.

2.

सध्या सोन्याचे दर रोज नवे विक्रम करत आहेत. त्यामुळे सोने घेणं सर्वसामान्यांसाठी अवघड झालं आहे. काही तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याचा दर आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत अनेकांना प्रश्न पडतो. काही वर्षांपूर्वी घेतलेल्या सोन्याला आज किती भाव मिळेल? भारतीय घरांमध्ये सोने ही केवळ शोभेची वस्तू नाही, तर भविष्यासाठीची सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. मात्र, जुने दागिने विक्रीस काढल्यावर अपेक्षित रक्कम मिळत नाही, अशी तक्रार अनेकांची असते. यामागचं मुख्य कारण म्हणजे दागिन्यांमध्ये मिसळलेले इतर धातू, तसेच डिझाइनसाठी आकारलेले अतिरिक्त खर्च.

3.

राज्य मंत्रिमंडळाची आज अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली असून या बैठकीत तब्बल 19 मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या निर्णयांचा केंद्रबिंदू शेतकरी, सिंचन, उद्योग, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधा असा सर्वांगीण विकासावर भर देणारा आहे. राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळणार असून हजारो कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिवंगत नेते अजित पवार यांनी पाठपुरावा केलेल्या तीन महत्त्वाच्या निर्णयांनाही मान्यता देण्यात आली. यामध्ये बारामती जिल्हा क्रीडा संकुल, मानवत येथील सूतगिरणीला अर्थसहाय्य आणि औद्योगिक विकासाशी संबंधित निर्णयांचा समावेश आहे.

4.

महाशिवरात्रीला भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्यामुळे देशभरातील शेकडो शिवमंदिरांत भाविकांची गर्दी होते आणि अभिषेक, पूजा व इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा १५ फेब्रुवारी २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या या सणासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने मुंबई सीएसएमटी आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

5.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार सध्या पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी फोन करून आस्थेने विचारपूस केली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही त्यांची तब्येत जाणून घेतली. सोमवारी तब्येत बिघडल्याने शरद पवार यांना बारामतीहून पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com