Today’s Top Breaking News
TODAY’S TOP BREAKING NEWS: 5 MAJOR DEVELOPMENTS YOU MUST KNOW

Today’s Top Breaking News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.
Published by :
Dhanshree Shintre
1.

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. सुमारे ४० मिनिटे चाललेल्या या बैठकीत राज्याच्या विकासासंबंधी विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, पार्थ पवार आणि जय पवार हेही उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

2.

ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात भारतीय स्थलांतरितांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लंडनमधील हाऊस ऑफ लॉर्ड्स कॅम्पसमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नवीन अहवालात असे म्हटले आहे की भारतीय स्थलांतर ब्रिटनसाठी ओझे नव्हे तर वरदान ठरले आहे. हा अहवाल बर्मिंगहॅममधील अॅस्टन विद्यापीठातील इंडिया सेंटर आणि लंडनच्या 'हिअर अँड नाऊ ३६५' यांनी तयार केला आहे.

3.

मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC) च्या नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी आज विधिवतपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनासोबत पहिली बैठक घेत शहराच्या विकासाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आणि कठोर भूमिका मांडली. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांचा पदग्रहण सोहळा तब्बल ९ दिवसांच्या विलंबानंतर आज सकाळी ९.३० वाजता पार पडत आहे.

4.

देशातील विविध कामगार, बँक कर्मचारी आणि शेतकरी संघटनांनी 12 फेब्रुवारी रोजी ‘भारत बंद’चे आवाहन केले असून, या बंदचा परिणाम अनेक क्षेत्रांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गुरुवारी होणाऱ्या या देशव्यापी संपात 10 केंद्रीय ट्रेड युनियन सहभागी होत असून, नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापार करार, मनरेगातील बदल आणि अन्य धोरणांविरोधात ही हाक देण्यात आली आहे.

5.

शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना पुण्यातील रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवारांना कफचा त्रास झाल्याने त्यांना पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा रूबी हॉल प्रशासनाकडून काल मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले आहे. पुढील उपचाराबाबत लवकरच निर्णय घेतले जातील पण आता त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com