Today’s Top Breaking News : आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Today’s Top Breaking News : आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या…

Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.
Published by :
Riddhi Vanne
1.

Toll Rule Change : अर्धवट एक्सप्रेस वेवर ‘अर्धा टोल’; 15 फेब्रुवारीपासून नवे नियम लागू

road Toll free | ganpati festival
road Toll free | ganpati festivalteam lokshahi

अर्धवट अवस्थेत असलेल्या एक्सप्रेस वेवर पूर्ण दराने टोल वसुली केली जात असल्याबाबत प्रवाशांकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेत टोल वसुलीच्या नियमांत मोठी सुधारणा केली आहे. 15 फेब्रुवारी 2026 पासून अर्धवट किंवा पूर्णपणे सुरू न झालेल्या एक्सप्रेस वेवर वाहनधारकांकडून कमी दराने टोल आकारला जाणार आहे.

2.

Metro Slab Collapsed : '100 टक्के निष्काळजीपणा दिसतो...', महापौर रितू तावडे यांचं वक्तव्य

Mumbaiमध्ये आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला. हा अवजड सिमेंटचा तुकडा रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर आदळला. या अपघातात चार जण जखमी झाले असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर रितू तावडे या घटनास्थळी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पाहणी केली आहे.

3.

Mumbaiमध्ये आज दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. Mulund (पश्चिम) येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या मेट्रोच्या कामादरम्यान उभारण्यात येत असलेल्या खांबाचा काही भाग अचानक खाली कोसळला. हा अवजड सिमेंटचा तुकडा रस्त्याने जाणाऱ्या एका ऑटोरिक्षावर आदळला. या अपघातात चार जण जखमी झाले असून उपचारादरम्यान एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे महापौर रितू तावडे या घटनास्थळी आल्या होत्या. यावेळी त्यांनी पाहणी केली आहे.

4.

Mumbai Local Block : मध्ये रेल्वेच्या विक्रोळी-मुलुंड स्थानकादरम्यान आज रात्रकालीन मेगाब्लॉक...

Mumbai Local Train Mega Block
Mumbai Local Train Mega BlockTeam Lokshahi

मध्य रेल्वेवरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात पादचारी उड्डाणपुलाच्या तुळया उभारण्याच्या कामासाठी विशेष वाहतूक आणि रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

5.

Hair Care : केसांच्या वाढीसाठी ही तेल आहेत सर्वोत्तम

Admin

“नारळ, आवळा, एरंडे, भृंगराज, बदाम, कांदा आणि ऑलिव्ह तेल केसांना पोषण, मजबुती व वाढीसाठी सर्वोत्तम ठरतात.”

6. Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चेवर मोठे वक्तव्य, म्हणाले...

chhagan bhujbal on sharad pawar
chhagan bhujbal on sharad pawar

महाराष्ट्रात विलिनीकरण यावर सध्या जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी अचानक चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. भुजबळ म्हणाले की या चर्चेला घाई करण्याचं काही कारण नाही आणि सर्व पक्षांनी एकत्र बसून विचार करावा लागेल.

7. Bhiwandi : भिवंडीत माजी महापौरांना अटक; अकोल्यात आमदारांवर अरेरावीचे आरोप, परिचारिका संघटना आक्रमक

राज्यातील दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये घडलेल्या घटनांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भिवंडी येथे महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या राड्या प्रकरणी माजी महापौर विलास पाटील यांना अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी पूर्ण केल्यानंतर ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काही भागांत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दाखल गुन्ह्यांवरून तपास सुरू होता. चौकशीत काही बाबी स्पष्ट झाल्यानंतर पाटील यांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com