
Indian Politics News: आज दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या पाच घडामोडींचा सविस्तर आढावा. राजकारण, अर्थकारण, क्रीडा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ताज्या बातम्या एका क्लिकवर जाणून घ्या.
Nitesh Rane On KeralaStory2 : आजच ‘केरला स्टोरी 2 – गोज बियॉन्ड' या चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर ट्रेलरची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून अनेकांनी चित्रपटाविषयी उत्सुकता व्यक्त केली आहे. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या केरला स्टोरी या गाजलेल्या चित्रपटाचा हा पुढील भाग असल्याने प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राष्ट्रवादीचे 12 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असल्याचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यासोबत संपर्कात असल्याचे लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती दिली आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये मंगळवारी (१७ फेब्रुवारी) झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. पल्लेकेले इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियमवर हवामानाने दणकून दिली असून, टॉसही होऊ शकला नाही. पंचांनी अनेक वेळा मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना रद्द घोषित केला, ज्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. यामुळे ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया बाहेर पडले, तर झिम्बाब्वेची सुपर ८ मधील जागा निश्चित झाली.
मुंबई | हिंदुहृदयसम्राट यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विशेष टपाल तिकीट जारी करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस व माजी खासदार यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री यांना लेखी निवेदन सादर केले असून, या मागणीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचे समजते.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पांग्री काटे शिवारात अवैध अफूच्या शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. दोन वेगवेगळ्या शेतात करण्यात आलेल्या या लागवडीवर पोलिसांनी धाड टाकून तब्बल १ कोटी ३२ लाख रुपयांची अफूची झाडे, बोंडे आणि फुले जप्त केली आहेत. याप्रकरणी दोन शेतकऱ्यांना एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे.
मुंबईत आज भारत-फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय लिहिला गेला. नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही देशांतील सहकार्य अधिक वाढवण्याचा निर्धार व्यक्त केला.
जेफ्री एपस्टीन प्रकरणाच्या नव्या उघडकीकरणामुळे जागतिक स्तरावर पुन्हा चर्चा रंगली असून, या फाइल्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मृत्यूनंतरही एपस्टीनच्या काळ्या कारनाम्यांमध्ये सामील झालेल्या बड्या हस्तींच्या नावांमुळे हा विषय पुन्हा डोके वर काढला असला तरी ट्रम्प यांनी सर्व आरोप तीव्र शब्दांत फेटाळले आहेत. ट्रम्प यांनी एपस्टीन त्यांच्या राजकीय कारकिर्दीला अडथळा ठरणारा व्यक्ती असल्याचा धक्कादायक दावा करून विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे.
शहराच्या लक्ष्मीपुरी परिसरात आज दुपारी एका युवकाने स्वस्तिक हॉटेलवर तुफान तोडफोड करून प्रचंड संताप व्यक्त केला. हॉटेल मालकाने युवकाच्या आईला अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून संतापलेल्या या युवकाने भरदिवसा दगडफेक करून हॉटेलाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेमुळे रिलायन्स मॉल परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून, बघ्यांच्या गर्दीमुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली.