महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या लाभार्थी महिलांमध्ये सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत जानेवारीचा १५०० रुपयांचा हप्ता जमा झालेला नसल्याने महिलांची चिंता वाढली आहे. आता फेब्रुवारीचा हप्ताही रखडला असून, दोन्ही हप्ते एकत्रित ३००० रुपये कधी खात्यात येणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
टी२० क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज म्हणून ओळखला जाणारा भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या करिअरातील सर्वात वाईट काळाचा सामना करत आहे. टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत त्याने तीन सलग सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यात शून्यावर बाद होऊन जगातील सर्वात 'कमनशिबी' फलंदाज बनला आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या या तीन सामन्यांत त्याला एकही धाव करता आली नाही, ज्यामुळे संघात त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या अधिकृत निवासस्थानी भेट घेतली. शिंदे यांनी त्यांचे स्वागत करून सन्मान केला. दोन्ही नेते काही काळ एकांतात चर्चा करत होते. या संवादात अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींवर विचारविनिमय झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर त्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट ठरली आहे.
देशातील केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार महागाई भत्ता (DA) वाढीची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सध्या सातव्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन घेत असलेल्या सुमारे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना या निर्णयाचा फायदा होऊ शकतो.
लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात प्रवाशांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे झोप लागल्यावर आपले स्टेशन चुकण्याची भीती. विशेषतः रात्रीच्या प्रवासात ही चिंता अधिक वाढते. मात्र आता भारतीय रेल्वे आणि IRCTC यांनी प्रवाशांसाठी मोठी दिलासा देणारी सेवा सुरू केली आहे. ‘डेस्टिनेशन अलर्ट’ आणि ‘वेक-अप अलार्म’ या अत्याधुनिक सुविधेमुळे प्रवाशांना आता निर्धास्त झोप घेता येणार आहे.