अनेकांचे दिवस सकाळच्या गरम चहा किंवा कॉफीने सुरू होतो, पण उपाशी पोटी याचे सेवन केल्यास अॅसिडिटी वाढते आणि दिवस कंटाळवाणा व चिडचिडा जातो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पचनास फायदेशीर पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. योग्य पदार्थ निवडल्यास पचनक्रिया सुधारते, शरीरास ऊर्जा मिळते आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहता येतो.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास आतड्यांतील घाण निघून जाईल आणि पचनक्रिया सुरळीत होऊन शरीर ताजेतवाने राहते.
ओट्समध्ये सोल्युबल फायबर असल्याने पचन सुधारते, पोट स्वच्छ राहते आणि बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळते; तसेच ओट्स खाल्ल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
पचन सुधारण्यासाठी पपई किंवा पपई स्मूदी प्यावी; पपई आणि किवीतील एंजाइम पोटफुगी कमी करतात आणि रोज फळे खाल्ल्याने शरीर हायड्रेट राहते.
रात्रभर भिजवलेल्या चिया बियांमध्ये भरपूर फायबर आणि ओमेगा-३ असतात; सकाळी उठल्यावर त्याचे पाणी प्यायल्यास पचन सुधारते आणि पोटाला आराम मिळतो.
अॅव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट, फायबर आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे पचन सुधारतात; सकाळच्या नाश्त्यात अॅव्होकॅडो टोस्ट खाल्याने आरोग्य लाभ मिळतो.
आठवड्यातून दोन-तीन वेळा नारळ पाणी प्यावे; यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीराची ऊर्जा वाढते, तसेच पचनक्रिया सुधारून आरोग्याच्या अनेक फायद्यांचा अनुभव मिळतो.