Dark circle : डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय अन् त्वचेची चमक परत मिळवा

Dark circle : डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय अन् त्वचेची चमक परत मिळवा

Published by :
Siddhi Naringrekar
1.

अनेकांना डार्क सर्कल्सची समस्या असते. डोळ्यांखालील ही काळी वर्तुळे कमी करण्यासाठी अनेकजण काहीना काही उपाय करत असतात. अनेक प्रकारच्या क्रिम चेहऱ्याला लावल्या जातात. या डार्क सर्कल्समुळे पूर्ण चेहरा थकलेला दिसून येतो. चेहऱ्यावरची चमक निघून जाते. एवढे सगळे करून देखील डार्क सर्कल्स कमी होण्याचे नाव घेत नाही. चला तर मग आता असे काही आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहोत ज्याने तुमचे डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत होईल.

2. पुरेशी झोप

Google

आपल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप खूप आवश्यक आहे. दररोज ७-८ तासांची शांत झोप घेणे गरजेचं आहे. पुरेशी झोप नसेल तर डार्क सर्कल्सची समस्या वाढत जाते. त्यामुळे पुरेशी झोप ही महत्त्वाची आहे.

3. बदाम तेल

Google

बदाम तेल खूप उपयोगी आहे. रात्री झोपताना डोळ्याखाली असलेल्या डार्क सर्कल्सवर हलक्या हाताने बदामाचे तेल लावावे. असे केल्यास डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

4. काकडी

Google

डार्क सर्कल्ससाठीच नाही तर काकडी डोळ्यांसाठी देखील खूप गुणकारी ठरते. काकडीमुळे डोळ्यांना थंडावा मिळतो. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवल्याने बारीक सुरकुत्या देखील कमी होतात आणि काळे वर्तुळ कमी करण्यास मदत होते.

5. एलोवेरा

Google

एलोवेरा हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे. एलोवेरा जेल लावल्याने डोळ्यांखालील काळसरपणा कमी होतो. रोज रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांखाली एलोवेरा जेल लावल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते.

6. बटाट्याचा रस

Google

कच्च्या बटाट्याचा रस देखील डार्क सर्कल्ससाठी उपयुक्त ठरतो. डोळ्याखाली बटाट्याचा रस लावल्याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. बटाट्याचा रस त्वचेला थंडावा देतो. त्वचेला हायड्रेट करतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com