चेहरा चमकदार दिसायला हवाय? करा 'हे' घरगुती उपाय
Google

चेहरा चमकदार दिसायला हवाय? करा 'हे' घरगुती उपाय

Published by :
Siddhi Naringrekar

प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची खूप काळजी घेत असतात. चेहरा तजेलदार दिसण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. प्रत्येकाला वाटतं की आपण सुंदर दिसावे, आपला चेहरा ग्लो करावा. आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेच आहे. त्यासाठी चेहरा दिवसातून दोनदा नीट स्वच्छ करणे अधिक महत्त्वाचे आहे. चला तर जाणून घेऊया चेहरा चमकदार दिसण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायद्याचे ठरतात

1. फेस मास्क

Google

फेस मास्क आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायद्याचा आहे. नियमित फेस मास्क लावल्याने चेहरा ताजातवाना राहतो.

2. भरपूर पाणी प्या

Google

पाणी आपल्या शरीरासाठी गरजेचे आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते तसेच डिहायड्रेशनची समस्या कमी होते. ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही.

3. योग्य आहार

Google

योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. सॅलेड, ताज्या भाज्यांचा आहारात समावेश करणे गरजेचे असून तेलकट, मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खावे.

4. गुलाबपाण्याचा वापर करावा

Google

तुमचा चेहरा तजेलदार दिसण्यासाठी गुलाब पाण्यामध्ये कापूस भिजवून चेहऱ्यावर ठेऊन मसाज करावा. असे केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

5. पुरेशी झोप आवश्यक

Google

पुरेशी झोप घेणे खूप गरजेचं आहे. किमान सात ते आठ तास पुरेशी झोप घेतल्याने चेहऱ्यावर चमक येईल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com