‘या’ राज्यांमधून लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार

‘या’ राज्यांमधून लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवणार

Published by :
Published on

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा, मणिपूरमध्ये कोविड लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चित्र काढून टाकले जाणार आहे. या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने लसीकरण प्रमाणपत्रावरून पंतप्रधानांचे छायाचित्र हटवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर या राज्यांमध्ये आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. तसेच आरोग्य मंत्रलायानुसार  CoWin प्लॅटफॉर्मवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आवश्यक ते फिल्टर लावणार असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविन प्लॅटफॉर्मवर लस प्रमाणपत्रातून मोदींचे चित्र काढून टाकण्यासाठी आवश्यक फिल्टर लावणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी जाहीर केले की, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या राज्यांमध्ये १० फेब्रुवारी ते ७ मार्च या सात टप्प्यांत विधानसभा निवडणुका होणार असून १० मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com