अफगाणिस्तानचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये;मोदींनी पाकसह चीनचे उपटले कान
अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादासाठी केला जाऊ नये. तुम्ही दहशतवादाचा हत्यार म्हणून वापर केला तर तो तुमच्यासाठीही घातक ठरू शकतो, असे तिकट विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या विधानाद्वारे मोदी यांनी पाकिस्तान आणि चीनला दहशतवादाच्या मुद्द्यावरून कडक शब्दात इशारा दिला. संयुक्त राष्ट्र महासभेत ते बोलत होते.
जो देश दहशतवादाचा राजकीय हत्यार म्हणून वापर करत आहेत, त्यांनीही हाच दहशतवाद त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकतो याचं भान ठेवावं, असं सांगतानाच अफगाणिस्तानच्या भूमीचा दहशतवादासाठी वापर होता कामा नये. त्यासाठी आपल्याला सतर्क राहिलं पाहिजे, असं आवाहन मोदींनी केलं. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना आपली गरज आहे. त्यामुळे त्यांना मदत करणं हे आपलं दायित्व आहे, असंही ते म्हणाले.
जगभरातील व्हॅक्सिन बनविणाऱ्यांना मी आमंत्रण देत आहे. या आणि भारतात व्हॅक्सिन बनवा, असं मोदी म्हणाले. भारतात कोविन अॅपमुळे लसीकरणाचा वेग वाढला आहे. भारताकडून जगातील गरीबांना लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

