अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमी परिसरात भक्तांना बंदी

अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमी परिसरात भक्तांना बंदी

Published by :
Published on

करोना फैलाव पाहता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासानं रामनवमीला राम जन्मभूमी मंदिरात भक्तांना प्रवेश बंदी केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्रनं ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

'करोनाच्या वाढत्या फैलावामुळे श्री राम जन्मभूमी परिसरात प्रभू रामांचा जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने मुख्य पुजाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. मात्र या जन्मोत्सव सोहळ्याला भक्तांना परवानगी नसेल.',असं श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राकडून ट्विटरवर सांगण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com