दरडग्रस्त गावांकरिता १३ कोटींचा निधी; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

दरडग्रस्त गावांकरिता १३ कोटींचा निधी; पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

Published by :
Published on

रायगड जिल्‍हयाच्‍या महाड व पोलादपूर तालुक्‍यातील  तळीये, केवनाळे व साखर सुतारवाडी या दरडग्रस्‍त गावांच्‍या कायमस्‍वरूपी पुनर्वसनाच्‍या हालचालींना आता वेग आलाय. या कामासाठी राज्‍य सरकारने 13 कोटी 25 लाख रूपयांचा निधी राज्‍य सरकारने मंजूर केलाय

या कामासाठी  भूसंपादनाबरोबरच पुनर्वसित गावांना वीज, पाणी , रस्‍ते व इतर सार्वजनिक नागरी सुविधा पुरवण्‍यात येणार आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेटटीवार यांनी ही माहिती मुंबईत दिली.

या गावांच्‍या तात्‍पुरत्‍या पुनर्वसनासाठी 55 लाखांपैकी 25 लाखांचा निधीदेखील मंजुर करण्‍यात आला आहे. 22 जुलै रोजी झालेल्‍या अतिवृष्‍टीत दरडी कोसळून या 3 गावांतील 97 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com