पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवले

Published by :
Published on

नाशिक | देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय नांदगावच्या वडाळी भागातील नागरिकांना नांदगाव शहरासोबत तालुक्यातील अनेक ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाले, ओढ्याना पूर आले असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहे.

वडाली-नांदगाव मार्गावर असलेला फरशीपुला वरून पुराचे पाणी वाहत असतांना एका तरुणाने मोटरसायकल पाण्यातून जाण्याचे धाडस केले. मात्र त्याचे हे धाडस त्याच्या अंगलट येऊन तो मोटारसायकलसोबत पुराच्या पाण्यात वाहू लागला होता मात्र त्याचे नशीब बलवत्तर होते.

त्यामुळे तेथे उभे असलेल्या तरुणांनी धाव घेऊन वाहून जाणाऱ्या या तरुणाला वाचवून जीवदान दिले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com