Sanjay Shirsat win Aurangabad West Assembly Election 2024: संजय शिरसाट विजयी; पत्नीला अश्रू अनावर
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये शिंदेसेनेचे संजय शिरसाट यांनी विजय मिळवला आहे. औरंगाबाद पश्चिममध्ये खरी लढत या दोन्ही शिवसेनेच्या उमेदवारांमध्येच झाल्याचे दिसून आले. शिंदेसेनेचे संजय शिरसाट आणि ठाकरे सेनेचे राजू शिंदे यांच्यात पहिल्या फेरीपासून चुरस पाहायला मिळाली. दरम्यान संजय शिरसाट विजयाच्या जवळ येताच कुटुंब झाल भावनिक झाले. त्यांच्या पत्नी आणि मुलगीला अश्रू अनावर आले.
उमेदवाराचं नाव - संजय शिरसाट
मतदारसंघ - औरंगाबाद पश्चिम मतदारसंघ
पक्षाचं नाव - शिवसेना एकनाथ शिंदे
उमेदवाराची कितवी लढत - चौथी लढत
समोर कोणाचं आव्हान - (शिवसेना उद्धव ठाकरे) राजू शिंदे
सन २००९ पासून औरंगाबाद पश्चिम मतदारसंघाचे नेतृत्व संजय शिरसाट करीत आहेत. नगरसेवक, सभागृह नेता असा राजकीय प्रवास करीत शिरसाट २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. पश्चिम मतदारसंघातून त्यांनी २००९ ते २०१९पर्यंत विजय मिळवला आहे. या विधानसभा निवडणुकीत शिरसाट यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजू शिंदे यांचे आव्हान आहे. त्यामुळे शिरसाट यांना सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी बरीच राजकीय समीकरणे जुळवावी लागत आहेत.
संदीप शिरसाट स्वराज्य पक्षाकडून, अंजन साळवे वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रमेश गायकवाड अपक्ष उमेदवार आहेत. गायकवाड यांची बजाजनगर, वाळूज भागात चांगली बांधणी केल्याची चर्चा आहे. या वेळी एमआयएमचा उमेदवार नसल्याने त्यांची मते कुणाच्या पारड्यात जाणार याची चर्चा आहे. दोन्ही शिवसेना आमनेसामने असल्याने चुरशीची लढत होणार आहे. सलग चौथ्यांदा निवडून येण्यासाठी शिरसाट यांच्यासमोर आव्हान असणार आहे.
सातारा-देवळाईसह विविध भागात शिरसाट यांनी रस्ते बांधून लोकांमधील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर शिरसाट यांनी शिवाजीनगरपासून ते बजाजनगरपर्यंत बांधणी ठेवली आहे. विकासकामांचा प्रचार करण्यात येत आहे.