मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. कामाख्या देवीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करणार असल्याची देखील माहिती मिळाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील ॲम्बुलन्समध्ये बसून गुवाहाटीला कसे पोहोचले? हे गिरीश महाजन आणि मंगेश चव्हाण यांना माहित असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय.
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्याचे पुर्ण राजकारण ढवळून निघाले. यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री घोषित करत सर्वांनाच देवेंद्र फडणवीस यांनी धक्का दिला होता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे खासदार व आमदार गुवाहटीत कामाख्या देवीचे दर्शन घेऊन आले. यावरुन शिवसेनेने सामना संपादकीयमधून शिंदे गटावर निशाणा साधला आहे.