(Dada bhuse ) विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शारीरिक तंदुरुस्ती आणि संघटनेची भावना विकसित व्हावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्यातील अनुदानित सैनिकी शाळांतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएतील टक्का वाढवण्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे सैनिकी शाळांच्या धोरणात सुधारणा करण्यात आली आहे.