Shakti Kapoor Birthday ; बॉलीवूडचे खलनायक शक्ती कपूर…नंदू सबका बंधू
चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत बॉलिवूडचा खलनायक ठरलेले 'क्राइम मास्टर गोगो' अर्थात अभिनेते शक्ती कपूर यांचा आज वाढदिवस. हिंदी सिनेसृष्टीमध्ये अभिनेते शक्ती कपूर यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
एकेकाळी परफेक्ट खलनायक म्हणून ओळखले जाणारे शक्ती कपूर यांनी नंतर कॉमिक भूमिकासुध्दा साकारल्या.3 सप्टेंबर 1958मध्ये त्यांचा जन्म दिल्लीमध्ये झाला. त्यांनी पद्मिमी कोल्हापूरेची बहीण शिवांगीसोबत झाले.शक्ती यांना दोन मुले मुलगी श्रध्दा कपूर आणि मुलगा सिध्दांत आहेत.
शक्ती यांनी सुनीद दत्त यांच्या 'रॉकी' सिनेमातून सिनेमातून अभिनयास सुरुवात केली. 90च्या दशकात शक्ती कपूर यांनी कॉमिक भूमिका साकारण्यास सुरुवात केली. 1994मध्ये आलेल्या डेव्हिड धवन यांच्या 'राजा बाबू' सिनेमात त्यांनी 'नंदू'चे पात्र साकारले होते. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट विनोदवीरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. 'अंदाज अपना अपना' सिनेमात 'क्राइम मास्टर गोगो'ची भूमिका साकारली. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 600 सिनेमांपेक्षा जास्त काम केले.
'कुर्बानी' ठरला सुपरहिट : यासिनेमात फिरोज खान, शक्ती कपूर, विनोद खन्ना, जीनत अमान, हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. हा चित्रपट एकूण 1.55 करोड इतक्या बजेट मध्ये तयार झाला असून त्याने बॉक्स ऑफिसवर जवळपास 12 करोड रुपयांची कमाई केली होती. या फिल्मने रेकॉर्ड तोडले होते. या सिनेमामुळे शक्ती कपूर यांचे नशीब उजळले होते.