Vidhansabha Election
Sharad Pawar On EVM Hack : 'काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं
EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे. काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं आहे. निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
विरोधकांनी निकालावर टीका सुरू केली असून पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले. राजकीय पक्ष केवळ भाष्य करत असताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून गुरुवारी (२८ नोव्हेंबर) महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषणाला बसले. ९५ वर्षीय बाबा आढाव यांच्या या आंदोलनाची दखल राजकीय नेतेही घेत आहेत. आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. EVM हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.शेवटच्या 2 तासातील आकडेवारी धक्कादायक आहे. काहींनी EVM हॅक होऊ शकतं याचं प्रेझेंटेशन दिलं आहे. निवडणूक आयोग इतकी चुकीची भूमिका घेईल असं वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.