धक्कादायक ! दोन वर्षांचा चिमुकला आठव्या मजल्यावरुन कोसळला

धक्कादायक ! दोन वर्षांचा चिमुकला आठव्या मजल्यावरुन कोसळला

Published by :
Published on

लहान मुलांना एकटं ठेवू नका त्यांच्यावर लक्ष द्या असे नेहमी सांगीतले जाते. त्यांची काळजी घ्या आजुबाजुला काही धोकादायक नाही ते पहायला हवे नाहीतर त्यामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. गुजरातच्या सूरतमध्ये काळीज हेलावून टाकणारी अशीच एक घटना घडली आठव्या मजल्यावरून खाली कोसळल्यानं एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे.

सूरतमधील एक लहान मुलगा आठव्या मजल्यावरून कोसळला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. दोन वर्षांचा चिमुरडा आठव्या मजल्यावरील लॉबीत खेळत होता. खेळता खेळता तो एका टोकाला आला. त्या ठिकाणी स्टिलचे ग्रील बसवण्यात आले होते. चिमुरडा त्यातून खाली वाकून पाहत होता. तितक्यात त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.

आठव्या मजल्यावरून खाली कोसळलेल्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. मिहिर दवे असं त्याचं नाव होतं. ७० फूट उंचीवरून खाली कोसळल्यानं मिहिरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घरोतील व्यक्ती कामात असताना ही घटना घडली

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com