रक्तदान शिबिरात गायक सोनू निगम यांनी केले रक्तदान
मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. रोज कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अशावेळी राज्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार अमित साटम यांच्या आदर्श फॉऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरास प्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी देखील उपस्थिती लावून शिबिराचे उद्घाटन केले. तसेच स्वतः रक्तदान देखील केले. यावेळी सोनू निगम यांच्या समवेत १९ वर्षीय गोल्फ पटू क्रिशीव तेकचंदानी देखील उपस्थित होता. अलीकडेच क्रिशीवने रक्तदान केले यासह त्याने स्पर्धेतून जिंकलेली रक्कम गोल्फ फील्डवरील कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी दिली होती.
आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन तुटवड्याचे संकट उभ राहील आहे. ही बाब लक्षात घेऊन सोनू निगम आणि गोल्फपटू क्रिशीवने एकत्र येत मुंबई शहरात ऑक्सिजन कंसेंट्रेटर देण्याचा निर्णय घेतला आहे.

