Asian Games Team India Squad : मराठमोळ्या ऋतुराजकडे भारताचे कर्णधारपद

Asian Games Team India Squad : मराठमोळ्या ऋतुराजकडे भारताचे कर्णधारपद

विश्वचषकामुळे बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

विश्वचषकामुळे बीसीसीआयने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतात होणाऱ्या विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.28 सप्टेबर ते 8 ऑक्टोबर यादरम्यान स्पर्धा रंगणार आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) म्हणजेच बीसीसीआयने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी 15 जणांच्या चमूची निवड केली आहे.

मराठमोळा ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपद सोपवण्यात आली आहे. आशिया क्रीडा स्पर्धामध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तसेच रिंकू सिंह, जितेश शर्मा, प्रभसिमरन यांच्याशिवाय अन्य युवा खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते की वर्ल्डकप २०२३ स्पर्धेसाठी निवड न होणाऱ्या खेळाडूंचा या स्पर्धेसाठी विचार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे की ही स्पर्धा खेळणारे खेळाडू भारतात होणाऱ्या २०२३ वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारताच्या मुख्य संघात नसतील.

भारतीय संघ

ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, शाहबाज अहमद, रवि बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंह (विकेटकिपर)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com