Hardik Pandya: पांड्याचे मुंबई इंडियन्समध्ये 'हार्दिक' स्वागत

Hardik Pandya: पांड्याचे मुंबई इंडियन्समध्ये 'हार्दिक' स्वागत

आयपीएलमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. त्यामुळे आगामी मोसमात पांड्या आता गुजरातसोबत दिसणार नाही.
Published by :
Team Lokshahi

आयपीएलमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे. अखेर पांड्याची घरवापसी झाली. हार्दिक पांड्याला रोख पैसे मोजून ट्रेड केलं आहे. त्यामुळे आगामी मोसमात पांड्या आता गुजरातसोबत दिसणार नाही. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात मोठ्या बदल्यांपैकी एक म्हणून हा ट्रेड पाहिला जात आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला. त्याच्या सध्याच्या फ्रेंचायझी गुजरात टायटन्ससोबत ट्रेड पूर्ण झाला आहे.  

मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात घेणार असल्याची चर्चा होती. अखेर पांड्याची घरवापसी झाली. पण त्यासाठी मुंबईनं कॅमेरुन ग्रीनला रिलीज केलं. गेल्या हंगामात तो मुंबईकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं 1शतक आणि 2 अर्धशतकं साजरी केली. 160.28 च्या स्ट्राईक रेटनं 452 धावा चोपल्या. कधीही गियर बदलून फलंदाजी करण्यात तो निपुण आहे. याशिवाय गोलंदाजीही उत्तम करतो. त्याला रिलीज करण्याचा निर्णय संघासाठी घातक ठरू शकतो.

गुजरातने पंड्याला रिटेन केले होते. पण काही काळातच मुंबईने ट्रेड केलं आहे. पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 123 सामने खेळले आहेत. या कालावधीत 2309 धावा केल्या आहेत. त्याने 10 अर्धशतके केली आहेत. हार्दिकची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या 91 धावा आहे. अष्टपैलू म्हणून त्याने 53 विकेट्सही घेतल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com